Thursday, July 9, 2009

नाहुनीया उभी मी...

नाहुनीया उभी मी सुकवीत केस ओले
वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले.

अवकाश भारलेला, माझे मला न भान
अनिवार एक होती, ओठावरी तहान
खासाचिया लयीत, संगीत पेरलेले
वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले.

साधून हीच वेळ, आला कोठुन वारा
सुकवीत फूल त्याने, लुटला पराग सारा
मग होय चंदनाचे अस्तित्व तापलेले
वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले

दाही दिशात तेंव्हा आली भरून तृप्ती
अंगांग तेवानारी, ही निवांत ज्योती
येई न सांगता जे, असे घडून गेले
वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले.
- सुधीर मोघे

No comments: