Thursday, May 22, 2008

नसतेस घरी तू जेव्हा..

One of the masterpieces by Salil Kulkarni and Sandeep Khare॥ The poem does magic with simple words.. music is fabulous.. and Salil's voice is indeed touching !!

Listen here..


नसतेस घरी तू जेव्हा..
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे वीरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दीशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हीरामुसून जाती मागे
खीडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मीठीत वीरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासावीण ह्रुदय अडावे
मी तसाच अगतीक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मीणमीण मीटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !


- संदीप खरे, सलील कुलकर्णी
आयुष्यावर बोलू काही (२००३)

No comments: